युरोपात हिमयुग येण्याची भीती; हिंदुस्थान, आफ्रिकेतील मान्सून पॅटर्न बदलणार

अटलांटिक महासागरातील मुख्य सागरी प्रवाह (ओशन करंट) युरोप आणि अन्य खंडांना उबदार ठेवतो, तो आता संपुष्टात येत आहे. म्हणजे थंड होत आहे. जर हा मुख्य सागरी प्रवाह थांबला तर युरोपमध्ये पुन्हा हिमयुग येऊ शकते. सर्वत्र बर्फच बर्फ होईल, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

अटलांटिक मेरेडियनल ओव्हरटार्ंनग सर्क्युलेशन (एएमओसी) नावाचा हा मुख्य सागरी प्रवाह गरम पाण्याला उष्णकटिबंधीय क्षेत्रातून आर्क्टिक महासागराकडे घेऊन जातो. त्यामुळे युरोपमध्ये थंडी सौम्य होते. मात्र हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळत आहे. ग्रीनलँडमधील बर्फाच्या चादरीतून थंड पाणी समुद्रात वाहत आहे. हे थंड पाणी अटलांटिक महासागरातील मुख्य प्रवाहाला बाधित करू शकते, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. जर एएमओसी संपुष्टात आली तर उत्तर युरोपमध्ये बर्फ आणि बर्फाचे वादळ येईल. आईसलँडचे हवामान मंत्री जोहान पॉल जोहान्सन यांनी हिमयुगाचे संकट देशाच्या अस्तित्वाला धोका असल्याचे म्हटले आहे. आईसलँड देश उत्तर धुवावर आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वात जास्त परिणाम होईल. हा धोका लक्षात घेऊन सरकार उपाययोजना करत असल्याचे जोहान पॉल जोहान्सस यांनी सांगितले.

अटलांटिक मेरेडियनल ओव्हरटार्ंनग सर्क्युलेशन (एएमओसी) संपुष्टात आले तर त्याचे दुष्परिणाम केवळ युरोप नव्हे, तर आफ्रिका, हिंदुस्थान आणि दक्षिण अमेरिकेवर होऊ शकतात. तिथला मान्सून पॅटर्न बिघडून कृषीक्षेत्र प्रभावित होऊ शकते.

Comments are closed.