वर्गात महिला विद्यार्थिनीवर चेनसॉने हल्ला
पीडितेचा मामा आरोपी : प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा संशय
वृत्तसंस्था, अनंतपूर
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिह्यातील राप्ताडू येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीवर चेनसॉने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणातील आरोपी हा पीडितेचा मामा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून समोर आले. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीकडून यापूर्वीही त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी सकाळी सुमारे साडेदहाच्या सुमारास आरोपी चेनसॉ घेऊन वर्गखोलीत शिरला आणि दहावीत शिकणाऱ्या 15 वषीय विद्यार्थिनीवर हल्ला केला. हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहरा, मान आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणारी आणखी एक विद्यार्थिनीही जखमी झाली. घटनेनंतर शाळेत घबराट पसरली. वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या परिसरात दुऊस्तीचे काम सुरू असल्याने सुऊवातीला आरोपी कामगार असल्याचा समज झाला. तो अचानक वर्गात शिरला आणि काही क्षणांत हल्ला करून बाहेर पळाला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पोलिसांना व ऊग्णवाहिकेला कळवले.
आरोपीचे नाव हेमंत उर्फ डुम्मू असून तो 21 वर्षांचा आहे. तो पीडितेचा मामा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याने काही काळापासून मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप केला. हल्ल्यानंतर दोन्ही जखमी विद्यार्थिनींना अनंतपूर येथील सरकारी ऊग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थिनीला पुढील उपचारांसाठी बेंगळुरू येथील ऊग्णालयात हलवण्यात आले.
Comments are closed.