FIFA विश्वचषक 2026 – महागाईचा फटका
वर्ल्ड कपच्या तिकिटांचे दर इतके महाग की काही सामन्यांसाठी स्टेडियममध्ये केवळ दहा टक्के तिकिटे विकली गेल्याच्या चर्चा आहेत. त्यात किती तथ्य आहे ते हळूहळू जगासमोर येईल, पण सध्या प्रेक्षकांना एका बिअरसाठी 17 डॉलर मोजावे लागत असल्याने घाम फुटू लागला आहे. त्यातच पार्किंग आणि सार्वजनिक वाहतुकीचे दर दुप्पट झाले आहेत. मैदानावर तापमान 30 अंशांच्या वर. खेळाडू घामाने चिंब, प्रेक्षक खर्चाने हैराण झाले आहेत.
Comments are closed.