FIFA World Cup 2026 – मेस्सीबरोबर इजिप्तच्या प्रशिक्षकांचा मैदानातच राडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने इजिप्तवर एक रोमांचक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एके वेळी सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना इजिप्त 2-0 ने आघाडीवर होता आणि विजय निश्चित वाटत होता. पण त्यानंतर पंचांच्या निर्णयामुळे फक्त काही मिनिटांतच सामना अर्जेंटिनाच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी मैदानात मेस्सी आणि इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

इजिप्तचा संघ पूर्णपणे निराश

या अनपेक्षित पराभवामुळे इजिप्तच्या संघात प्रचंड निराशा आणि संताप पसरला आहे. सामन्याच्या तणावपूर्ण अंतिम क्षणांमध्ये इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन आणि लिओनेल मेस्सी यांच्यात टच लाइनजवळ जोरदार वाद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या वादानंतर लगेचच प्रशिक्षक हसन यांनी फिफाच्या वंशभेदविरोधी भूमिकेचे प्रदर्शन केले. ज्यामुळे मेस्सीलाही आश्चर्य वाटले. सामना अधिकारी आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी हस्तक्षेप केला आणि हा राडा अखेर शमला.

होसाम हसन यांचा मोठा दावा

हसन यांनी म्हटले की, अर्जेंटिनाचा विजय पूर्णपणे अनपेक्षित आणि अन्यायकारक होता. होसाम हसन यांनी लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाला फायदा मिळाल्याचा थेट आरोप करत म्हटले, ‘मैदानावर आम्ही प्रत्येक बाबतीत गतविजेत्यांपेक्षा सरस दिसत होतो. पण या सामन्याचा निकाल बाहेरच्या काही घटकांमुळे प्रभावित झाला होता. कदाचित त्यांना विश्वविजेत्यांना स्पर्धेत टिकवून ठेवायचे होते. त्यांना मेस्सीने शर्यतीत पुढे राहावे असे वाटत होते.’

Comments are closed.