FIFA World Cup Final – राडा होणार, पोरं नाय ऐकणार… सोमवारी शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर, ‘या’ राज्यातील सरकारची घोषणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या दीड महिन्यांपासून 48 संघांमध्ये रंगलेल्या फिफा विश्वचषकाचा प्रवास आता अखेरच्या टप्पावर पोहोचला असून रविवारी मध्यरात्री गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये महासंग्राम रंगणार आहे. या महासंग्रामाची क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातही फुटबॉल फिव्हर पाहायला मिळत असून फुटबॉलवेड्या केरळममध्ये तर अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता फिफा विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा प्रारंभ होईल. विद्यमान जगज्जेता अर्जेंटिना विरुद्ध युरोपियन विजेता आणि फिफा क्रमवारीतील अव्वल स्पेन अशी ही रंगतदार अंतिम लढत म्हणजे फुटबॉलविश्वासाठी एक पर्वणी ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर केरळम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्याचा थरार उशिरापर्यंत रंगणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींना रात्री जागून सामन्याचा आनंद घेता यावा आणि दुसऱ्या दिवशी अडचण होऊ नये म्हणून केरळम सरकारने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. रविवारी याची घोषणा करण्यात आली. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय

Comments are closed.