'एआय' घोटाळ्यातील पाचवा आरोपी अटक

मध्यप्रदेशातून अन्य दोघांना घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधासंदर्भात दिल्ली पोलिसांनी पाचवी अटक केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथून युवा काँग्रेस नेता जितेंद्र यादव याला अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी दोन सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आले. तसेच सोमवारी पोलिसांनी भारतीय युवा काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष उदय भानू चिब यांचीही चौकशी केली. ग्वाल्हेर येथून ताब्यात घेतलेल्या दोघांमध्ये राजा गुर्जर आणि अजय कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी शर्टलेस निषेधात भाग घेतल्याचा आरोप आहे. व्हिडिओद्वारे त्यांची ओळख पटवण्यात आली. दिल्लीच्या टिळक नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली. या सर्वांना दिल्लीला आणण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजामीनपात्र कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. 21 फेब्रुवारी रोजी पटियाला न्यायालयाने पूर्वी अटक केलेल्या चारही आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले. 20 फेब्रुवारी रोजी भारतीय युवा काँग्रेसचे 11 सदस्य एआय समिटदरम्यान भारत मंडपममध्ये घुसले होते. यावेळी त्यांनी  शर्टलेस होऊन पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली होती

Comments are closed.