विदेशी गुंतवणूकदारांनी 1.27 लाख कोटी भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, नेमकं काय घडलं? जाणून घ्या कारण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ, रशियासंदर्भातील अमेरिकेची आक्रमक भूमिका यामुळं वाढलेली अनिश्चितता आणि काही कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील कमजोर निकाल यामुळं विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. सेबीच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2024-25 विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या इक्विटी सेगमेंटमधील 1.27 लाख कोटी रुपयांचे शेअर विकले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेचा विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. रेसिप्रोकल टॅरिफमुळं तणाव वाढल्यानं अमेरिकेच्या बाँडमध्ये तेजी आली आहे, त्यामुळं शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. भारतीय शेअर बाजारातून इक्विटीमधून पैसे काढले तरी विदेशी गुंतवणूकदार डेब्ट सेगमेंटमध्ये सक्रिय आहेत. या सेगमेंटमध्ये 1.4 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांच्या मते सध्या पोर्टफोलिओ मॅनेजर शेअर खरेदी केल्यानंतर होल्ड करण्याऐवजी असेट अलोकेशनवर लक्ष देत आहेत. आता त्यांच्या प्राथमिकतेमध्ये भारत नाही, असं सांगण्यात आलं आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार जेएम फायनान्शिअलच्या एका अभ्यासानुसार जुलैमध्ये विदेशी गुंतवणूकादरांनी आयटी, बीएसएफआय, रिअल्टी आणि ऑईल अँड गॅस या क्षेत्रातील शेअरची विक्री केली. टेक उद्योगात 2285 दशलक्ष डॉलर्सचे शेअर विकले गेले. बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, विमा क्षेत्रातील स्टॉकमध्ये 671 दशलक्ष डॉलरची विक्री झाली. रिअल्टी सेक्टरमध्ये 450 दशलक्ष डॉलरच्या शेअरची विक्री झाली. ऑटो क्षेत्रातील 412 दशलक्ष डॉलरची विक्री झाली आहे. ऑइल अँड गॅस क्षेत्रातील 372 दशलक्ष डॉलरच्या शेअरची विक्री झाली.

दरम्यान काही स्टॉकमध्ये खरेदी देखील झाली आहे. मेटल सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 388 दशलक्ष डॉलरची खरेदी केली आहे. सर्व्हिसेसमध्ये 347 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली. तर, एफएमसीजीच्या 175 दशलक्ष डॉलर, टेलीकॉम क्षेत्रात 169 दशलक्ष डॉलर्स आणि केमिकल क्षेत्रात 130 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशितः 14 ऑगस्ट 2025 05:14 पंतप्रधान (आयएसटी)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.