अंतिम प्रभागरचना लवकरच; प्रभागांची नावे आणि 14 ते 15 बदलांची शक्यता

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचनेची प्रतीक्षा संपणार असून, शासनाच्या वेळापत्रकानुसार ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकती व सुनावणीनंतर शासनाने त्यात सुमारे १४ ते १५ बदल केल्याची चर्चा आहे. यामध्ये सहा ते सात प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा, तर आठ ते दहा प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल केल्याचे बोलले जात आहे.
सुनावणीदरम्यान नैसर्गिक हद्दी न पाळल्याचे, प्रभागांची मनमानी मोडतोड केल्याचे आरोप करण्यात आले. तसेच या बदलांचा आगामी आरक्षण प्रक्रियेवरही परिणाम होणार असल्याचे सूचित केले होते. ही प्रभागरचना महापालिकेकडून शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केली. त्यानंतर नगरविकास विभागाने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला.
या टप्प्यावर उपनगरांतील काही प्रभागांच्या हद्दींमध्येच मुख्य बदल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हे बदल फार मोठे नसल्याचे सांगितले जात आहे. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम रचना शासनाच्या वेळापत्रकानुसार ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी दसरा, ३ तारखेला शुक्रवार, तर पुढील दोन दिवस शनिवार-रविवार असल्याने शासकीय सुट्ट्यांचा अडथळा आहे. त्यामुळे महापालिकेस प्रभागरचनेचा अंतिम आराखडा मिळाल्यानंतरच तो अधिसूचनेसह जाहीर केला जाणार आहे. महापालिकेस हा आराखडा बुधवार अथवा शुक्रवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.