IND vs PAK: ‘पाकिस्तान सुधरत नाही’, भारत- पाक सामन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूर विषयी नेमकं काय घडलं?

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना आज, 21 सप्टेंबरला, आज खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज हारिस रऊफने एक लाजिरवाणं वर्तन केले आहे. हारिस रऊफची ही कृती पाकिस्तानच्या खेळाडूंची खरी औकात दर्शवते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू झाला आहे. सामन्यापूर्वी दोन्ही टीमचे खेळाडू मैदानावर सराव करत होते. त्यावेळी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज हारिस रऊफला अनेक वेळा ‘6-0’ असा घोष करताना ऐकले गेले.

पाकिस्तानच्या खेळाडूंनी हारिस रऊफच्या या कमेंटला भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरशी जोडून पाहिले आहे. याआधी पाकिस्तानने भारतासोबत तणाव असताना दावा केला होता की, त्यांनी भारतीय सैन्याची 6 लढाऊ विमाने तोडले आहेत, पण प्रत्यक्षात असे काही घडलेले नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले, तरी पाकिस्तान अजूनही आपल्या वर्तनातून बाजूला जात नाही.

पाकिस्तानच्या गोलंदाज हारिस रऊफच्या (Haris Rauf) कमेंटमुळे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, हे तो ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलत होता की मैदानावर खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल सामन्याचा स्कोर सांगत होता. रऊफच्या या कमेंटला भारतीय टीमने आधीच मैदानावर प्रतिसाद दिला होता, ज्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला.

आशिया कपमधील लीग स्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेटने पराभूत केले होते. टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सलमान अली आगा यांच्याशी हात नाही मिळवल्याने पाकिस्तान गोंधळून गेला होता.

Comments are closed.