Finance Minister Nirmala Sitharaman to announce 5-day bank week in Budget
देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शनिवारी अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यावेळी बँकेचा 5 दिवसांच्या आठवड्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण मागील काही वर्षांपासून शनिवार व रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी बँक कर्मचारी करताना दिसत आहे.
नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शनिवारी अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार यावर सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या नजरा आहेत. अशातच बँकेचा 5 दिवसांच्या आठवड्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण मागील काही वर्षांपासून शनिवार व रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी बँक कर्मचारी करताना दिसत आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman to announce 5-day bank week in Budget)
बँका सध्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करतात, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. मात्र गेल्या काही काळापासून 5 दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी बँक कर्मचारी करत आहे. यासंदर्भात बँक कर्मचारी संघटना, आरबीआय आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली आहे. मात्र या निर्णयाला अद्याप आरबीआय आणि सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असले तरी इंडियन बँक्स असोसिएशन आणि अर्थ मंत्रालय यांच्यात पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात एक करार झाला आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण आरबीआय आणि सरकारकडे आहे. त्यामुळे सरकारने जर पाच दिवसांच्या आठवड्याला मंजुरी दिली तर बँका दर महिन्यात शनिवारी आणि रविवारी बंद राहतील. मात्र कर्मचाऱ्यांना 5 दिवस 40 मिनिटे अतिरिक्त काम करावे लागणार आहे.
हेही वाचा – BUDGET 2025 : तुमच्या खिशावर परिणाम करतील पाच बदल; 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम
पाच दिवसांचा आठवडा झाल्यास बँकांचा वेळ बदलणार
केंद्र सरकारने बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला तर बँकिंग तासांमध्ये 40-45 मिनिटांची वाढ होऊ शकते. सध्या बँका सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुल्या असतात. मात्र आता 9.45 मिनिटांनी बँक सुरू होईल आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत बँक सुरू राहू शकते. याचा अर्थ सकाळी 15 मिनिटे बँक लवकर आणि संध्याकाळी 30 मिनिटे उशिरापर्यंत बँकेच्या वेळेत वाढ होऊ शकते.
ग्राहकांना होणार त्रास
दरम्यान, पाच दिवसांचा आठवडा झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना फायदा होईल, मात्र ग्राहकांना या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता आहे. कारण बहुतेक ग्राहक हे जर्नरलशिपमध्ये कामाला जातात. त्यामुळे त्यांना जर बँकेमध्ये जाऊन काही काम करायचे असेल त्यांना शनिवारी वेळ मिळतो. मात्र पाच दिवसांचा आठवडा झाल्यास ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचण होईल. त्यामुळे ग्राहकांना मध्यल्या वाराला सुट्टी घेऊन बँकेची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
हेही वाचा – Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती थकलेल्या नाहीत, सोनिया गांधी यांच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर
Comments are closed.