बीएमडब्ल्यू अपघातात वित्त मंत्रालयाच्या अधिका official ्याने ठार केले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या धौला कुआंमध्ये झालेल्या भीझण बीएमडब्ल्यू दुर्घटनेवरून दाखल एफआयआरमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या दुर्घटनेत अर्थ मंत्रालयातील उपसचिव नवजोत सिंह यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत.
एफआयआरनुसार दुर्घटनेनंतर नवजोत सिंह यांचा श्वासोच्छवास सुरू होता, तर त्यांच्या पत्नी संदीप कौर वारंवार आरोपी दांपत्याला त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्याची विनंती करत होत्या. परंतु आरोपी महिलेने याकडे दुर्लक्ष केले होते. बीएमडब्ल्यू चालक महिला आणि तिच्या पतीने जखमी नवजोत यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्याऐवजी जाणूनबुजून 19 किलोमीटर अंतरावरील एका छोट्या रुग्णालयात पोहोचविल्याचा आरोप संदीप कौर यांनी केला आहे. तर पोलिसांनी महिला आरोपी गगनप्रीतला अटक केली आहे.
जखमी नवजोत यांनी एका मालवाहू व्हॅनमधून नेण्यात आले, जेथे रक्तबंबाळ नवजोत यांनी कुठल्याही प्राथमिक उपचाराशिवाय ठेवण्यात आले. तर डॉक्टरांनी काही वेळानंतर नवजोत यांना मृत घोषित केले. तर दुर्घटनेपूर्वी संबधित महिला बीएमडब्ल्यू कार भरधाव अन् बेजबाबदारपणाने चालवित होती असे एफआयआरमध्ये नमूद आहे.
महिलेने कारवरील नियंत्रण गमावत थेट नवजोत यांच्या दुचाकीला टक्कर मारली होती. या टक्करनंतर बाइक प्रथम दुभाजक आणि मग बसला जाऊन आदळली होती. यामुळे नवजोत आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार जप्त करत आरोपी महिलेला अटक केली आहे. तसेच तिच्या पतीची चौकशी केली आहे. दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.
Comments are closed.