वेस्ट इंडिज क्रिकेटवर आर्थिक संकट; खेळाडूंच्या पगारात कपात, स्पर्धाही रद्द

वेस्ट इंडिजचा पुरुष क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघ रविवारपासून (27 सप्टेंबर) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. अशातच क्रिकेट वेस्ट इंडिजच्या आर्थिक संकटाबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्याचबरोबर स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजने या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनात 25% कपात आणि 2026 हंगामाची पुरुषांची सुपर 50, महिलांची टी20 ब्लेझ स्पर्धा रद्द करण्याचे निर्णय यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत 12 महिन्यांचे करार केले जातात आणि त्याप्रमाणे मानधन दिले जाते, मात्र त्या मानधनामध्ये 25% कपात केली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या कराराचा कालावधी सात महिन्यांचा करण्यात आला आहे.
अनेक स्पर्धा रद्द
मंडळाने खर्च कमी करण्याचा आणि आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी यावर्षीच्या
पुरुषांची सुपर 50 आणि महिलांची टी20 ब्लेझ स्पर्धा रद्द केल्या आहेत.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे मुख्य कार्यकारी ख्रिस डेहरिंग म्हणाले, “वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशन आणि खेळाडूंनी दाखवलेल्या सहकार्याच्या भावनेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, ज्यांनी आपण सर्व ज्या परिस्थितीचा सामना करत आहोत त्याबद्दल पूर्ण समज दाखवली आहे. ही परिस्थिती आदर्श नसली तरी, आर्थिक स्थैर्याच्या दिशेने हे एक आवश्यक पाऊल आहे.”
“आंतरराष्ट्रीय रिटेनर करार 12 महिन्यांचेच राहतील, परंतु रिटेनर शुल्कामध्ये 25% कपात केली जाईल,” असेही डेहरिंग यांनी निवेदनात म्हटले आहे.
“खरं तर, गेल्या 15 वर्षांत क्रिकेट वेस्ट इंडिजने देशांतर्गत विमान कंपन्यांवर ऐंशी दशलक्ष अमेरिकन डॉलर्सहून अधिक खर्च केले आहेत, पण त्या लाभार्थ्यांकडून प्रायोजकत्वाच्या रूपात एक डॉलरही परत मिळालेला नाही. अनेक वर्षे हा भार उचलल्यामुळे निर्माण झालेली तात्काळ पैशांची अडचण आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर आर्थिक नुकसानीचाही आम्हाला सामना करावा लागेल,” असे देहरिंग म्हणाले आहेत.
सध्या पुरुष क्रिकेट संघाचे लक्ष्य 2027 च्या विश्वचषक पात्रतेवर आहे. तसेच त्यांचा भारताच्या दौऱ्यातून आपली कामगिरी आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न असेल. याआधी अनेक संघाना भारताविरुद्ध खेळताना मोठा आर्थिक फायदा झालेला आहे. (Financial crisis hits West Indies cricket; players’ salaries cut, tournaments cancelled.)
Comments are closed.