गुंतवणूक केलेले पैसे कधी होणार दुप्पट? 72 चा नियम वापरा, एका मिनीटात माहिती मिळवा

आर्थिक नियोजन टिप्स: प्रत्येक गुंतवणूकदारांचे स्वप्न असते की त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे. भविष्यातील गरजांसाठी जसे की निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्न यासाठी एक चांगला निधी निर्माण करावा. जर तुम्ही मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुमचे पैसे कधी दुप्पट होणार? असा प्रश्न विचारत असाल तर आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर देणारा एक सोपे सूत्र म्हणजे  72 चा नियम. जर तुम्हाला एक स्मार्ट गुंतवणूकदार बनायचे असेल तर हे सूत्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 72 चा नियम हा तुमचे पैसे गुंतवणुकीत दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. तुम्हाला फक्त 72 ला गुंतवणुकीच्या व्याजदराने भागायचे आहे.

काय आहे 72 चा नियम?

हा एक सोपा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीत तुमचे पैसे किती वर्षांत दुप्पट होतील हे शोधू शकता. फक्त 72 ला गुंतवणुकीच्या व्याजदराने (परतावा दराने) भागा. कोणताही आकडा आला तरी, तुमचे पैसे इतक्या वर्षांत दुप्पट होतील.

72 चा नियम वेगवेगळ्या गुंतवणुकीत कसा काम करतो?

फिक्स्ड डिपॉझिट (FD): जर FD वर 7 टक्के वार्षिक व्याज दिले तर पैसे सुमारे 10.28 वर्षांत (72 ÷ 7) दुप्पट होतील.

PPF: सध्या, PPF वर ७.१ टक्के व्याज आहे, म्हणजेच रक्कम सुमारे १०.१४ वर्षांत (७२ ÷ ७.१) दुप्पट होईल.

शेअर बाजार: 2024 मध्ये निफ्टीने 50 ने 13.5 टक्के परतावा देत असेल, तर पैसे फक्त 5.3 वर्षांत (72 ÷ 13.5) दुप्पट होऊ शकतात.

म्युच्युअल फंड: सरासरी 12 टक्के परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये, पैसे सुमारे 6 वर्षांत (72 ÷ 12) दुप्पट होतील.

हे का फायदेशीर आहे?

हा नियम गुंतवणूकदारांना कॅल्क्युलेटर न वापरता किंवा लांबलचक गणिते न करता अंदाज लावण्यास मदत करतो. विशेष म्हणजे याचा वापर केवळ गुंतवणुकीसाठीच नाही तर महागाई आणि जीडीपी वाढ यासारख्या गोष्टींसाठी देखील केला जाऊ शकतो.

आणखी वाचा

Comments are closed.