24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढा, राज ठाकरे यांची पोलिसांना सूचना

शिवतीर्थावरील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून खोडसाळपणा केला. या घटनेचा शिवसैनिकांनी निषेध केला. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पुतळ्याची पाहणी केली.

राज ठाकरे यांनी दादरच्या शीवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. तसेच आरोपींना 24 तासांच्या आत पकडा अशा सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

Comments are closed.