फिनलंडच्या राष्ट्रपतींचे भारतात स्वागत

रायसीना चर्चासत्रा‘त प्रमुख व्याख्यानासाठी दौरा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

फिनलेड या देशाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे भारतात आगमन झाले असून दिल्लीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. 4 मार्च ते 7 मार्च असे तीन दिवस त्यांचा हा भारत दौरा आहे. येथे प्रत्येक वर्षी ‘रायसीना चर्चासत्र’ हा कार्यक्रम आयाजित करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या कार्यक्रमात त्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यशी चर्चा करणार आहेत.

त्यांच्या भारत दौऱ्याचा मुख्य हेतू भारताशी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणे हा आहे. भारताशी व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक जवळीकीचे करण्यासाठी आपला देश उत्सुक आहे, असे त्यांनी दौऱ्याच्या प्रारंभी स्पष्ट केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टब यांचे स्वागत केले. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर पोहचतील. व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अधिक जवळ येतील. दोन्ही देशांना या सहकार्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

महत्वाच्या नेत्यांना भेटणार

अलेक्झांडर स्टब हे आपल्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत. ते गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. ते प्रशासनातील इतर वरीष्ठ नेत्यांशीशी चर्चा करतील. दोन्ही देश त्यांच्या परस्पर हितांचा विचार करुन महत्वाचे निर्णयही या दौऱ्यात घेणार आहेत.

अनेक सामंजस्य करार होणार

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना अनेक महत्वाचे द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे समोर येणार आहेत. पुनउ&पयोगी ऊर्जा निर्मिती, जलसंधारण, कृषी, संरक्षण आणि वीजनिर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांशी सहकार्य करण्यास सज्ज असून या संदर्भात अनेक सामंजस्य करार या चर्चेनंतर केले जातील, अशी माहिती भारताच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

युद्धावरही चर्चा शक्य

सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध भडकले आहे. हे युद्ध अधिक काळ लांबले, तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम संभवतात. हे युद्ध थांबावे अशी अनेक देशांची इच्छा असून या देशांमध्ये भारत आणि फिनलंड या देशांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अलेक्झांडर स्टब यांच्या चर्चेत हा मुद्दाही प्रामुख्याने असेल, असे दिसून येत आहे.

संध्याकाळी व्याख्यान

गुरुवारी संध्याकाळी येथे ‘रायसीना चर्चासत्रा’चे उद्घाटन होणार आहे. या सत्राच्या प्रथम दिनी अलेक्झांडर स्टब हे प्रमुख भाषण करणार आहेत. या भाषणातही ते भारताशी द्विपक्षीय संबंध आणि सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती, यांच्यावर त्यांची मते व्यक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर स्टब यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा होईल. राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ विशेष भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती आहे.

भारत-फिनलंड चांगले मित्र

भारत आणि फिनलंड यांच्या मैत्रीच्या इतिहासाचा प्रारंभ भारताच्या स्वातंत्र्यापासून मानला जातो. फिनलंड हा उत्तर ध्रूवानजीकचा एक निसर्गसौंदर्याने नटलेला शांतताप्रिय देश आहे. या देशाने आधुनिक विज्ञानातही चांगली प्रगती केली आहे. भारतात गुंतवणूक करण्याची या देशाची इच्छा असल्याचे दिसून येते. युरोपियन महासंघाच्या माध्यमातूनही तो भारताच्या नजीक आलेला आहे. या देशात नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या देशात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी नसली, तरी ती गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या देशाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मैत्री आहे.

अनेक सामंजस्य करार होणार

ड गुरुवारी भारत आणि फिनलंड यांच्यात अनेक सामंजस्य करार होणार

d नवीकरणीय आणि वापरण्यायोग्य ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सहभागी व्हा

ड व्यापार, आयात निर्यात वाढविण्याचा दोन्ही देशांनी व्यक्त केला निर्धार

Comments are closed.