आफ्रिकाविरुद्ध शानदार विजय मिळवत न्युझीलंडचा फायनलमध्ये दणक्यात प्रवेश! फिन ॲलन-सेफर्टच्या खेळीने आफ्रिकेचं स्वप्नं पुन्हा धुळीस

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. कीवी संघासाठी फिन ॲलनने (Phinn alyen Century) सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ॲलनने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांची खेळी केली.
या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 169 धावा उभारल्या होत्या. मार्को यानसेनने खालच्या फळीत येऊन केलेल्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेला हे लक्ष्य गाठता आले. सेमीफायनलच्या दबावाखाली हे आव्हान न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक असेल असे वाटत होते, मात्र फिन ॲलनच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
170 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फिन ॲलनने Phinn alyen) पहिल्या चेंडूपासूनच आफ्रिकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने मैदानाच्या चारी बाजूंना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. ॲलनने केवळ 33 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी करत टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतकांपैकी एक नोंदवले. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडने विजयासाठी लागणाऱ्या 170 धावा केवळ 12.5 षटकांत पूर्ण केल्या. फिन ॲलन सोबत टीम सेफर्टने (Tim Sephart) देखील 58 धावांची शानदार खेळी केली. या वादळी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. या मोठ्या विजयासह न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.
चांगल्या फॉर्मात असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा बाद फेरीच्या (Knockout) सामन्यात अपयशी ठरला. ग्रीम स्मिथचा विक्रम मोडणाऱ्या एडन मार्करमसाठी (Aiden Markram) हा पराभव मोठा धक्का ठरला आहे.
Comments are closed.