बोगस लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहिणी योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यात सरकारने सुरवात केली आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करीत ही माहिती दिली आहे. गुन्हे दाखल होण्यास सुरवात झाल्यामुळे खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. या विविध योजनांमुळे सरकार तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडू लागला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यावर या योजनांना कात्री लावण्यास सुरवात केली आहे. त्याची सुरवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपासून झाली आहे. कारण निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे सुतोवाच महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच होते.
आता सरकारने कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. अनेक महिलांनी उत्पन्नाचा बनावट दाखल सादर केला होता. त्याशिवाय इतर बनावट कागदपत्रे सादर केली होती. खोटी कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाल्यानंतर आता निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट अर्जदारांना एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रीया सुरू असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच उघड झाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बनावट अर्जदारांना…
– अदिती एस टाटकेरे (@iadititatkare) 31 जानेवारी, 2025
Comments are closed.