नेहा सिंह राठोडविरूद्ध एफआयआर
वाराणसी: उत्तरप्रदेशातील साधना फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सौरभ मौर्य यांनी बिहारची लोकगीत गायिका नेहा सिंह राठोड विरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून अपमानास्पद वक्तव्यं केल्याप्रकरणी ही तक्रार नोंदविण्यात आली. नेहा सिंह राठोडने एका व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून भ्याड आणि जनरल डायर असे शब्द वापरले होते. तिचा हा व्हिडिओ पाकिस्तानात प्रसारित होत असल्याने केवळ पंतप्रधानांचा नव्हे तर पूर्ण देशाचा अपमान होत असल्याचे मौर्य यांनी स्वत:च्या तक्रारीत म्हटले आहे.
Comments are closed.