जगनमोहन रेड्डीविरूद्ध एफआयआर दाखल केले

अमरावती :

हिट अँड रन प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती गुंटूर जिह्याचे पोलीस अधीक्षक एस सतीश कुमार यांनी दिली. माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने सहा दिवसांपूर्वी रोड शो दरम्यान 53 वर्षीय व्यक्तीला चिरडले होते. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मृताचे नाव चिली सिंघय्या आहे. ते जगनमोहन यांच्या पक्षाचे वायएसआरसीपीचे कार्यकर्ते होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. रोड शो दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना 18 जूनची आहे. जगन पालनाडू जिह्यातील रेंटपल्ला गावात एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. पोलिसांच्या छळामुळे गेल्यावर्षी या कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. जगनमोहन त्यांच्या समर्थनार्थ रोड शो करत होते.

 

Comments are closed.