शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर एफआयआर दाखल
अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पॉक्सो न्यायालयाने ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत. जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी यांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि पीडितांच्या जबाबांवरून आता कायदेशीर कारवाई सुरू होईल. शनिवारी या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी करताना प्रयागराजच्या विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांनी अविमुक्तेश्वरानंद आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आणि कसून तपास करण्याचे आदेश दिले. आशुतोष ब्रह्मचारी यांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील प्रयागराज पोलीस आयुक्तांचा तपास अहवाल आधीच न्यायालयात सादर करण्यात आला असून तो न्यायालयाने आपल्या कार्यवाहीसाठी आधार म्हणून वापरला. न्यायालयाच्या आदेशामुळे आता पोलिसांना संबंधित कलमांखाली औपचारिक खटला दाखल करून सखोल चौकशी करावी लागेल.
Comments are closed.