बांगलादेशात कपडय़ाच्या कारखान्यात आग; 16 ठार

बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका कपडय़ाच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाची तब्बल 12 पथके आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

ढाक्यातील मीरपूर भागातील सात मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी दोन वाजता आग लागली. या मजल्यावर कपडय़ाचा कारखाना असल्यामुळे काही क्षणांतच आग पसरली. आगीने इमारतीचा दुसरा व तिसरा मजला पूर्णपणे वेढला. त्यावेळी कारखान्यात असलेले कामगार आगीत सापडले. काहींनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Comments are closed.