ठाण्यातील घोडबंदर परिसरात ब्लू रूफ या लग्नाच्या हॉलमध्ये आग, लग्न सुरू असतानाच लागली आग
ठाणे पश्चिम, घोडबंदर रोडवरील ओवाळे येथील द ब्लू रूफ क्लबच्या पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री आग लागल्य़ाची घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असताना ही घटना घडली. ही आग फटाक्यांमुळे लागली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#पाहा | ठाणे, महाराष्ट्र | ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील ब्लू रूफ क्लबला गुरुवारी रात्री साडेदहा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भीषण आग लागली. बऱ्याच प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
व्हिज्युअल स्रोत: ठाणे महापालिका… pic.twitter.com/b1taFUfm57
— ANI (@ANI) १८ डिसेंबर २०२५
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या तरी, जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
Comments are closed.