रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग लागली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक पथके तात्काळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही मोठे नुकसान न होता आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप तपासले जात आहे. दिल्ली पोलिसांचे फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी उपस्थित होते.
सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराच्या बेडरूममध्ये आग लागली. यासंबंधीची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवेच्या तीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी 8:35 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. ही घटना राष्ट्रीय राजधानीतील आगीच्या घटनांच्या मालिकेतील आणखी एक घटना आहे. यापूर्वी, 6 जानेवारी रोजी आदर्श नगर येथील दिल्ली मेट्रो स्टाफ क्वार्टरच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.
Comments are closed.