गुजरातमधील अंडर-कन्स्ट्रक्शन बुलेट ट्रेन स्टेशनवर अग्निशामक बाहेर पडले

साबरमतीमधील घटनेने यंत्रणांची धावपळ

वृत्तसंस्था/ .अहमदाबाद

गुजरातमधील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनवर शनिवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी भीषण आग लागली. सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. वेल्डिंगचे काम सुरू असताना आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले. तथापि, याबाबत नेमके कारण शोधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 14 गाड्यांना ती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 2 तास लागले, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी दिली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात साबरमती स्टेशन परिसराचा मोठा भाग आगीने वेढल्याचे दिसत आहे.

Comments are closed.