अगडोंबा; 48 घरे जळत आहेत

रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडी येथे वणव्यामुळे आगडोंब उसळून 48 घरे, चाऱ्याच्या गवत गंज्या आणि वाडे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

इंदरदेव धनगरवाडीत आज वणव्यामुळे अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडले. गावातील शेतकऱ्यांची 48 घरे, गवत गंज्या व गुरांचे गोठे जळून राख झाले. सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही धनगरवाडी अत्यंत दुर्गम भागात असल्याने येथे अग्निशमन दलाच्या छोटय़ा गाडय़ा पाठविण्यात आल्या.

Comments are closed.