Fire in Night Club – म्युझिक कॉन्सर्टदरम्यान नाईट क्लबमध्ये भीषण आग, 51 जण होरपळले

नाईट क्लबमध्ये म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान भीषण आग लागल्याची घटना उत्तर मॅसेडोनियात घडली. या आगीत 51 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. पायरो टेक्निक इफेक्टमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फटाके बनवण्यासाठी पायरो टेक्निक इफेक्टचा वापर केला जातो.

राजधानी स्कॉप्जेपासून 100 किमी दूर कोसानी शहरात नाईट क्लबमध्ये रविवारी पहाटे म्युझिक कॉन्सर्ट सुरू होती. या कॉन्सर्टचा आनंद लुटण्यासाठी सुमारे 1500 जण क्लबमध्ये उपस्थित होते. प्रसिद्ध हिप-हॉप कपल एडीएनचा लाईव्ह परफॉर्मन्स सुरू असतानाच अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले आणि संपूर्ण क्लब आगीने वेढला.

या आगीत 51 जण होरपळून मरण पावले तर अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल, आपत्कालीन पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.