अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आल

अंबरनाथ: अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंबरनाथ (Ambernath Crime News) शहरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Ambernath Crime News)

एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे.

Ambernath Crime News: नेमकं काय घडलं?

दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने ३-४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले, हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला झाल्याने काही प्रमाणात परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Ambernath Crime News: नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावरती अज्ञातंकडून गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांचे नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले, तर आज संध्याकाळी अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.