सीआरपीएफ बेसजवळ गोळीबार, 3 अटक

चुराचांदपूर :

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात सीआरपीएफ तळानजीक गोळीबार केल्याप्रकरणी दोन पोलिसांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सीआरपीएफ तळानजीक एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफ जवानांनी गोळीबार केल्याने आरोपींनी कारमधून पळ काढला होता. सुरक्षा दलांन सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत कारची ओळख पटवत एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर या घटनेत सामील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.