‘गव्हर्नर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज; मनोज वाजपेयीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने 56 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मनोज वाजपेयीच्या आगामी ‘गव्हर्नर’ चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, या चित्रपटात मनोज वाजपेयी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची झलक चाहत्यांना दाखवणार आहेत. मनोज वाजपेयी यांनी या चित्रपटाशी संबंधित दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आले आहेत. मनोज बाजपेयींचा लूक अद्याप समोर आलेला नसला तरी, ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चालतानाचा एक पाठमोरा दिसणारा फोटो शेअर करण्यात आला आहे.
मनोज बाजपेयीने स्वतः या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ‘गव्हर्नर’चे कार्यालय दिसत असून त्यांची खुर्ची रिकामी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या कॉरिडॉरमधून चालतानाचा एक पाठमोरा दिसणारा फोटो आहे. तसेच मनोज वाजपेयीने पोस्टर शेअर करत या फोटोंच्या कप्शनमध्ये ‘आज आपण एक जागतिक महासत्ता आहोत, कारण एका निनावी नायकाने एक अज्ञात युद्ध लढले’ असे दिले आहे. त्याचबरोबर ‘GOVERNOR’ हा चित्रपट 12 जून 2026 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Comments are closed.