Period : पहिली मासिक पाळी? अशी घ्या काळजी

पहिली वहिली मासिक पाळी ही कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतो. साधारपणे वयाच्या 12-13 व्या वर्षापासून मुलीला मासिक पाळी येण्यास सुरूवात होते. काही मुलींना 13 वर्षाच्या आतच मासिक पाळी येते, कारण हे प्रत्येक मुलीच्या शारीरिक विकासावर अवलंबून असते. मासिक पाळीची सुरूवात झाल्याने आणि तारूण्यात येण्याने मुलीच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. काही मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर 6 ते 7 दिवस राहते तर काहींना केवळ 2 दिवस. असा परिस्थितीत, मासिक पाळीबाबत मुलींना काही सामान्य गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान कोणती उत्पादने वापरायची? वेदनांचा सामना कसा करावा? कपड्यांवर पाळीचे डाग पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी? आहार कसा घ्यावा? या सर्वाची माहिती मुलींना माहीत असणे आवश्यक आहेत, जेणेकरून पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर मुली गोंधळून जाणार नाही.

  • मासिक पाळीत रक्तस्त्राव होत असल्याने, सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉनचा वापर करणे आवश्यक आहे.
  • पॅड कसे वापरायचे माहित नसल्यास घरातील मोठ्या मंडळीची मदत घेऊ शकता.
  • रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा नॅपकिन पूर्ण भरला असेल तर नियमितपणे बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून दुर्गंधी आणि संसर्ग टाळता येईल.
  • सॅनिटरी नॅपकिन आणि टॅम्पॉनमुळे काहीवेळा इन्फेक्शन होऊ शकते, अशावेळी तुम्ही मेनस्ट्रुअल कप वापरू शकता.
  • मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्स आणि पोटदुखी होणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  • मूड स्विंग्स होत असल्यास चित्रपट पाहू शकता.
  • मासिक पाळी आजार नाही तर तो एक बदल आहे, ही गोष्ट लक्षात घ्या.
  • मासिक पाळीत मसालेदार अन्न खाणे टाळून पौष्टिक खाण्याकडे लक्ष द्या.
  • आहारातून आयोडीन, लोह, कॅल्शियम शरीरात जाईल याची काळजी घ्यावी.
  • मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेड राहील आणि रक्तस्त्राव सुरळीत होईल.
  • ओटीपोटात जास्त दुखत असेल गरम पाण्याचा शेक घेऊ शकता.
  • हलका व्यायाम केल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होऊ शकतात.
  • मासिक पाळी दरम्यान शरीराला विश्रांतीची गरज असते, त्यामुळे या दिवसात भरपूर झोप घ्या.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.