शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण; दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार
सांस्कृतिक ठेवा जतन करत महापौर निवास बनले आकर्षक संग्रहालय
दादर येथे उभारण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. याशिवाय प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या पंत्राटदाराची तसेच मे. आभा लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 180.99 कोटींचा खर्च आला.
स्मारकाचे काम आणि कामाचे विविध टप्पे तज्ञ वास्तुविशारदांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
महापौर निवासस्थान आणि इतर संबंधित इमारतींव्यतिरिक्त 3 एकर जागेत बागबगिचा तयार करून परिसराचे सुशोभीकरण करण्याची कामे करण्यात आली असून संपूर्ण परिसर सुंदर आणि आकर्षक झाला आहे.
Comments are closed.