CSK vs PBKS: म्हात्रेचा अर्धशतकी धमाका; चेपॉक स्टेडियमवर ऐतिहासिक विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
आयपीएल 2026 हंगामातील 7 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या CSK च्या संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 209 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात युवा फलंदाज आयुष म्हात्रेने (Ayush mhatre) महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने 43 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या या खेळीच्या जोरावर आयुषने चेपॉक स्टेडियमवर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, कारण दुसऱ्याच षटकात 14 धावांवर त्यांनी संजू सॅमसनच्या रूपाने पहिला गडी गमावला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुष म्हात्रेने सुरुवातीला काही चेंडू सावधपणे खेळले, पण नंतर आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. आयुषने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह 18 वर्षे 261 दिवस वयात आयपीएलच्या इतिहासात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आयुषने आपल्या 73 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले, यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 169.77 इतका होता.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्गज युवा खेळाडू पाहायला मिळाले आहेत, ज्यात आता आयुष म्हात्रेचे नावही जोडले गेले आहे. पंजाबविरुद्ध अर्धशतक पूर्ण करताच, वयाची 19 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आयपीएलमध्ये 2 वेळा ’50 प्लस’ धावांची खेळी करण्याच्या बाबतीत त्याने पृथ्वी शॉच्या (Prithwi Shaw) विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत वैभव सूर्यवंशी पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.
19 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी
वैभव सूर्यवंशी – 3
पृथ्वी शॉ – २
आयुष म्हात्रे –
Comments are closed.