‘द फॅमिली मॅन-3’ पहिले पोस्टर रिलीज

अभिनेता मनोज वाजपेयीची बहुचर्चित वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन-3’ चे पहिले पोस्टर मंगळवारी रिलीज करण्यात आले. या वेबसीरीजची मनोज वाजपेयींच्या चाहत्यांना प्रचंड उत्सूकता आहे. प्राईम व्हिडीओने पोस्टर शेअर करताना म्हटले की, सर्वांच्या नजरा ‘द फॅमिली मॅन-3’ कडे लागल्या आहेत. नवीन सीझन लवकरच येत आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्या आहेत. या सीरीजमध्ये मनोज वाजपेयी शिवाय, संदीप किशन, श्रेया धनवंतरी, जुगल हंसराज, दर्शन कुमार, हरमन सिंघा हे कलाकार दिसणार आहेत.

Comments are closed.