शतकावर शतक! दोन खेळाडूंची तुफानी कामगिरी, इंग्लंडला घाम फोडला!

टीम इंडियाचे (Team india) 3 वेगवेगळे संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. एका बाजूला शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली सीनियर टीम कसोटी मालिका खेळत आहे. दुसरीकडे अंडर-19 संघ आयुष म्हात्रेच्या (Aayush Mhatre) नेतृत्वात 5 वनडे सामन्यांची यूथ मालिका खेळत आहे. तिथेच महिला संघ कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टी-20 मालिकेमध्ये इंग्लंडशी दोन हात करत आहे. इंग्लंडच्या अंडर-19 टीमविरुद्ध 5 जुलै 2025 रोजी चौथ्या वनडे सामन्यात भारताच्या खेळाडूंनी जोरदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला.

भारत अंडर-19 संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ओपनर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) तुफानी शतक ठोकले. त्याने केवळ 52 चेंडूत शतकी खेळी करत 147 धावा केल्या. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 10 षटकार मारले. वैभव बाद झाल्यावर त्याचा साथीदार विहान मल्होत्रानेही (Vihaan Malhotra) शतक ठोकले. विहानने 110 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार मारून शतक झळकावले.

शतक पूर्ण केल्यानंतरही विहान थांबला नाही. त्याने शेवटच्या 21 चेंडूत 29 धावा केल्या. तो 121 चेंडूत 129 धावा करून बाद झाला. विहानच्या खेळीत एकूण 15 चौकार आणि 3 षटकार सामील होते.

विहान मल्होत्रा हा मूळचा पंजाबमधून येतो. त्याचे वय फक्त 18 वर्ष आहे. 1 जानेवारी 2007 रोजी पटियाला येथे जन्मलेला विहान पंजाब अंडर-16 टीममध्ये खेळला असून आता भारताच्या अंडर-19 टीमचा भाग आहे. विहान मधल्या फळीत उत्तम फलंदाजीसाठी ओळखला जातो. या मालिकेमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांत त्याने एकूण 242 धावा केल्या आहेत.

Comments are closed.