Ratnagiri News – मासेमारी सुरू पण डिझेलचा प्रश्न जाळ्यातच गुरफटलेला, १३८ रूपये लिटर दराने डिझेल कसं परवडणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आल्यानंतर आजपासून कोकण किनारपट्टीवर मासेमारीला प्रारंभ झाला. मासेमारी सुरू झाली तरी अजून मच्छिमारांचा डिझेलचा प्रश्न सुटलेला नाही. १३८ रूपये लीटर दराने डिझेल खरेदी करणे हे मच्छिमारांना परवडणारे नाही.पेट्रोलपंपाच्या दरातच आम्हाला डिझेल द्यावे अशी मागणी मच्छिमारांनी केली.

१ जून पासून मासेमारी बंदीचा काळ सुरू झाला.महाराष्ट्र राज्य सरकारने यंदा मासेमारी बंदीचा काळ १५ ऑगस्ट पर्यंत वाढवला होता. त्यामुळे १ ऑगस्टपासून केवळ केंद्र सरकारच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी होती. आजपासून महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारीला सुरूवात झाली. आज मच्छिमार नौका समुद्रात झेपावल्या.काही मच्छिमार नारळी पोर्णिमेच्या मुहूर्तावर मासेमारी सुरू करणार आहेत.

मासेमारी सुरू झाली तरी मच्छिमारांच्या डिझेलचा प्रश्न सुटलेला नाही. १३८ रूपये प्रतिलीटर दराने डिझेल विकत घेणे मच्छिमारांना परवडणारे नाही. डिझेलबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे मच्छिमारांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.