बाल लैंगिक शोषणाचे व्हिडीओ; रायगडात पाच गुन्हे
बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ व छायाचित्रे तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध रायगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी रेवदंडा, मुरुड, दादर सागरी, खालापूर आणि खोपोली या पाच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
रायगड पोलिसांकडून इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने सायबर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. याचदरम्यान बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओंची ऑनलाइन देवाणघेवाण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. संबंधित अहवालांचे परीक्षण करून त्यातील प्रोफाइल आयडीची पडताळणी करण्यात आली. तपासात काही युजर्सनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओ तयार करून ते स्वतःकडे बाळगल्याचे तसेच इन्स्टाग्रामवर अपलोड करून इतर युजर्सपर्यंत प्रसारित केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणातील आरोपींचे 16 ते 28 वर्षे वय असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
Comments are closed.