बिहारमध्ये काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर.
विधान परिषद निवडणुकीत तीन जागांवर आरजेडीशी थेट लढत
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बिहार विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. आरजेडीनेही तीन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे तीन जागांवर मित्रपक्ष आरजेडीसोबत थेट लढत होणार आहे. साहजिकच यावेळी बिहार विधान परिषद निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीतील उमेदवार आमने-सामने येणार आहेत.
बिहार विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहातील आठ जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. पदवीधर कोट्याअंतर्गत चार जागा आणि शिक्षक कोट्याअंतर्गत चार जागांचा कार्यकाळ 16 नोव्हेंबर रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहार विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून पाच नावांना मंजुरी दिली आहे. या उमेदवारांमध्ये डॉ. मदन मोहन झा (दरभंगा-शिक्षक ), मनोज कुमार जयस्वाल (कोसी-पदवीधर), रजनीकांत पाठक (दरभंगा-पदवीधर), डॉ. संजय यादव (पाटणा-शिक्षक) आणि डॉ. असदुल्ला खान (पाटणा-पदवीधर) यांनी नावे निश्चित झाली आहेत.
Comments are closed.