फिलिपिन्समध्ये प्रवासी जहाजाला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू, डझनभर बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फिलिपिन्समध्ये प्रवासी जहाजाला भीषण आग लागल्याने किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक बेपत्ता झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 42 जणांची सुटका करण्यात आली आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे, असे तटरक्षक दलाच्या प्रवक्त्या कमोडोर नोमी कायाब्याब यांनी सांगितले.

मनीलाहून निघालेल्या एमव्ही जून ॲस्टर (MV June Aster) जहाजाला गुरुवारी रात्री आग लागली. जहाजात 117 प्रवासी आणि 17 क्रू मेंबर्स होते. पालावान प्रांतातील कोरोनजवळ किनाऱ्यापासून सुमारे 2.2 किलोमीटर (1.3 मैल) अंतरावर जहाजाला अचानक आग लागली. तटरक्षक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. सुटका करण्यात आलेल्यांपैकी 38 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते.

Comments are closed.