छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांसह पाच ठार
ट्रक-स्कॉर्पियोची टक्कर , तिघे गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ जांजगीर
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्dयात भीषण दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 49 वर मंगळवारी रात्री उशिरा स्कॉर्पियो आणि भरधाव ट्रकची टक्कर झाली असून यात 5 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नवागढ येथील 8 रहिवासी स्कॉर्पियो वाहनामून पंतोरा गावात एका विवाहाच्या वरातीत सामील होण्यासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा परतताना महामार्गावर ट्रकसोबत त्यांच्या वाहनाची टक्कर झाली. स्थानिक लोकांनी दुर्घटनेसंबंधी कळविल्यावर पोलीस तसेच रुग्णवाहिका तेथे पोहोचल्या. दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेतील गंभीर जखमींना बिलासपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले दोन जण सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एकाचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Comments are closed.