छत्तीसगडमध्ये पाच किलो आयईडी जप्त

वृत्तसंस्था/रायपूर

छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांनी पेरलेली 5 किलो आयईडी जप्त केली आहेत. स्फोटकांची माहिती मिळताच विशेष टीमला पाचारण करून ती निक्रिय करण्यात आली. ही स्फोटके कोंटा पोलीस स्थानक हद्दीतील बांदा गावाजवळ पेरण्यात आली होती. सीआरपीएफच्या 228 व्या बटालियन आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ती जप्त केली. सध्या नक्षलग्रस्त भागात सतत शोधमोहीम सुरू आहे. राज्यातून नक्षलवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे लढाई सुरू केली आहे. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून नक्षलविरोधी लढा सुरू आहे.

Comments are closed.