इराणच्या बंदरात भीषण स्फोट; 5 ठार, 700 जखमी

इराणच्या बंदर अब्बास पोर्टवर झालेल्या भीषण स्फोटात 5 ठार तर 700 जण जखमी झाले आहेत. येथील राजाई बंदरात असलेल्या कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून स्फोटाची तीव्रता कळू शकते. धुराचे लोट आणि इमारतींच्या काचा इतरत्र पडल्या आहेत. शाहिद रजई बंदराच्या एका गोदी भागात झालेल्या स्फोटामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. हे इराणमधील सर्वात अत्याधुनिक कंटेनर बंदर असून बंदर अब्बास शहराच्या 23 किलोमीटर पश्चिमेला आहे.
Comments are closed.