टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या निवडीवर 5 मोठ्या अपडेट्स समोर! सूर्या-गंभीर घेणार महत्त्वाचा निर्णय?

टी-20 विश्वचषक 2026 ची यजमानी भारत आणि श्रीलंका (Imdia & Shrilanka) संयुक्तपणे करणार आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून ते आधीच निश्चित झाले आहेत. विश्वचषक भारतात होत असल्याने, टीम इंडिया हा या मेगा स्पर्धेचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाने आतापर्यंत 7 टी-20 मालिका खेळल्या असून सर्वच मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. आता पुढील टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला 10 टी-20 सामने खेळायचे आहेत.

2026 च्या विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) कर्णधार असेल, तर शुबमन गिल (Shubman gill) उपकर्णधार होण्याची जवळजवळ खात्री आहे.

तसेच तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनाही संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. लोअर मधल्या फळीमध्ये शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांनाही संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचाही संघात समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

Comments are closed.