Navi Mumbai news – उलवेत एकाच कुटुंबातील पाच जण अत्यवस्थ; एकाचा मृत्यू

उलवे येथील जावळे गावातील एकाच कुटुंबातील पाच जण घरात अत्यवस्थ अवस्थेत सापडल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यातील संतोष लुहार (२२) याचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करीत आहेत.
जावळे येथील सेक्टर-५ मध्ये रमेश लुहार (२७) त्यांची पत्नी बसंती लुहार (२५), धाकटा भाऊ संतोषकुमार आणि मुलगा आयुष, आर्यन असे पाच जण वास्तव्यास आहेत. दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आज दुपारी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पाचही सदस्य अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांना तत्काळ पनवेलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महाराष्ट्र | नवी मुंबईतील जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले. शेजाऱ्यांपैकी एकाने फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी दरवाजा उघडला असता पाचही सदस्य बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने नेण्यात आले…
— ANI (@ANI) 23 ऑक्टोबर 2025

Comments are closed.