अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात लॅपटॉपला आग; पाच प्रवासी भाजले, टेक्सासमध्ये आपत्कालीन लँडिंग
अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात प्रवाशाच्या लॅपटॉपला आग लागल्याने पाच प्रवासी भाजले. विमान कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आग विझवली. यानंतर टेक्सास येथील डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिग करण्यात आले. विमान उतरताच पॅरामेडिक्सनी जखमी प्रवाशांची तपासणी केली. एका प्रवाशाला घटनास्थळीच वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्याला सोडण्यात आले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाईन्सचे 2398 हे विमान अटलांटाहून टेक्सासला येत होते. या विमानात 133 प्रवासी आणि कर्मचारी होते. विमान आपल्या गंतव्यस्थानी पोहचत असतानाच एका प्रवाशाच्या लॅपटॉपला आग लागली. क्रू मेंबर्सने तात्काळ धाव घेत आग विझवली. यानंतर विमानाचे टेक्सासमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि थेट गेटपर्यंत नेण्यात आले. विमान उतरताच वैद्यकीय पथके आणि विमानतळावरील आपत्कालीन मदत पथके तिथे पोहोचली.
Comments are closed.