मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, एसी बंद; प्रवासी अडीच तास ताटकळले
मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अडीच तास प्रवासी विमानात ताटकळले. एसीशी संबंधित तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना उकाड्यातच बसावे लागले. बिघाड दुरुस्त केल्यानंतर अडीच तासांनी विमानाने उड्डाण केले. त्यानंतर अहमदाबादहून मुंबईला परत येणाऱ्या विमानालाही विलंब झाला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे AI 2503 हे विमान सोमवारी दुपारी 12.55 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण करणार होते. विमान धावपट्टीच्या दिशेने जात असतानाच एसीशी संबधित तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. यानंतर विमान पुन्हा पार्किंग बे कडे वळवण्यात आले.
विमान पार्किंगमध्ये असतानाच प्रवासी आधीच सुमारे एक तास विमानात बसून होते. त्यानंतर, तांत्रिक बिघाड दुरुस्त करेपर्यंत त्यांना आणखी जवळपास दोन तास विमानातच प्रतीक्षा करावी लागली. अखेर, दुरुस्ती केल्यानंतर नियोजित वेळेच्या अडीच तास उशिराने दुपारी 3.25 वाजता विमान रवाना झाले. विमान संध्याकाळी 4.30 वाजता अहमदाबादला पोहोचले.
Comments are closed.