'बाहुबली' वरून 'CMS-03' ची फ्लाइट
सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित : नौदलाची ताकद वाढणार : इस्रोचा आणखी एक विक्रम प्रस्थापित
मंडळ/श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचा (इस्रो) चार हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा संप्रेषण उपग्रह ‘सीएमएस-03’ प्रक्षेपित करत उत्तुंग झेप घेतली आहे. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:26 वाजता बाहुबली रॉकेटद्वारे 4,410 किलो वजनाचा ‘सीएमएस-03’ हा संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. भारतीय भूमीवरून भू-समकालिक हस्तांतरण कक्षेमध्ये (जीटीओ) प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे नौदलाची संप्रेषण क्षमता आणखी मजबूत होणार आहे.
नौदलासाठी विकसित केलेला ‘सीएमएस-03’ उपग्रह ‘एलव्हीएम3-एम5’ ह्या बाहुबली रॉकेटने ‘जीटीओ’ या लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवला आहे. आता 3-4 दिवसांनी उपग्रहाचे इंजिन सुरू झाल्यानंतर तो कक्षेत भ्रमण करणार आहे. त्यानंतर 24 तास कव्हरेज देण्यासाठी सक्रिय होणार असल्याचे इस्रोने सांगितले. ‘सीएमएस-03’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एकमेकांना आलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन हेसुद्धा उपस्थित होते. ‘सीएमएस-03’ उपग्रहाच्या माध्यमातून नौदलाच्या नेटवर्क-केंद्रित युद्धक्षमता वाढवण्यास मोदी मदत होणार आहे. साहजिकच भारताच्या किनारपट्टीपासून 2,000 किलोमीटर अंतरावर पसरलेल्या हिंदी महासागर प्रदेशातील नौदल जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि किनारी कमांड सेंटर्समध्ये अखंड संवाद साधता येणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.
‘एलव्हीएम3-एम5’ची मोठी किमया
‘सीएमएस-03’च्या उ•ाणासाठी भारताचे प्रसिद्ध प्रक्षेपण वाहन ‘एलव्हीएम3-एम5’ने भरारी घेतली. हे उ•ाण ‘एलव्हीएम3-एम5’ म्हणून ओळखले जाईल. या उ•ाणाद्वारे भारताचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह ‘सीएमएस-03’ अवकाशात पोहोचला. हा उपग्रह भारतीय नौदलासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो केवळ सागरी क्षेत्रात दळणवळण मजबूत करणार नाही तर ऑपरेशन सिंदूरसारख्या महत्त्वाच्या ऑपरेशन्समधून मिळालेल्या उणिवा दूर करण्यासही मदत करणार आहे.
सुरक्षा दलांची कार्यक्षमता वाढणार
‘सीएमएस-03’ हा लष्करी संप्रेषण उपग्रह नौदलाची संप्रेषण आणि देखरेख क्षमता वाढवेल. हिंदी महासागर क्षेत्रात चीनने निर्माण केलेल्या आव्हानांना पाहता, लष्करी समन्वय, गुप्तचर माहिती सामायिकरण आणि जलद धोक्याच्या प्रतिसादासाठी प्रगत संप्रेषण महत्त्वपूर्ण आहेत. ‘सीएमएस-03’मध्ये अनेक फ्रिक्वेन्सी बँड वापरल्यामुळे ते आवाज, व्हिडिओ आणि डेटा प्रसारित करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
‘सीएमएस-03’मुळे नौदलाच्या ताफ्यातील जहाजे आणि पाणबुड्या महासागराच्या दूर पल्ल्यावरील भागातही संपर्क राखू शकतील. हा उपग्रह एकाचवेळी 50 हून अधिक नौदल प्लॅटफॉर्मना जोडण्यास सक्षम असेल. तसेच अंदमान-निकोबार, लक्षद्वीप यांसारख्या बेटांसह संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात सतत उच्च-बँडविड्थ संप्रेषण कव्हरेज प्रदान करेल. त्याव्यतिरिक्त पाळत ठेवणे, टोही, नेव्हिगेशन आणि हवामान निरीक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल. अधिक शक्तिशाली अॅम्प्लिफायर आणि संवेदनशील रिसीव्हर्ससह सुसज्ज असलेला हा उपग्रह कठीण परिस्थितीतही विश्वसनीय संप्रेषण राखणार आहे.
‘एलव्हीएम3’ भारताचे विश्वसनीय रॉकेट
‘एलव्हीएम3’ हे भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन आहे. त्याचे पूर्ण नाव लाँच व्हेईकल मार्क-3 असे आहे. हे रॉकेट अवकाशात जड माल वाहून नेण्यासाठी डिझाईन केलेले आहे. आतापर्यंतच्या चार उ•ाणांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वात अलीकडील उ•ाण चांद्रयान-3चे असून त्यामध्ये भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरणारा पहिला देश ठरला होता. आता ‘एलव्हीएम3-एम5’ने ‘सीएमएस-03’च्या उ•ाणात महत्त्वाची भूमिका निभावत आणखी एक मैलाचा दगड पादाक्रांत केला आहे.
‘सीएमएस-03’ : भारताचा सर्वात जड संप्रेषण उपग्रह
‘सीएमएस-03’ म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाईट मिशन-03. हा एक मल्टी-बँड कम्युनिकेशन उपग्रह असून तो अनेक रेडिओ लहरींवर कार्य करेल. अंदाजे 4,410 किलोग्रॅम वजनाचा हा भारताकडून भू-समकालिक हस्तांतरण कक्षेमध्ये प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा सर्वात जड संप्रेषण उपग्रह असेल. हा उपग्रह सात वर्षे कार्यरत राहील. तो भारतीय मुख्य भूमी आणि मोठ्या महासागरीय क्षेत्रांना व्यापेल.
उपयुक्तता…
भक्कम सुरक्षा : नौदल अधिकारी शत्रूच्या हालचालींवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवू शकतील.
सहज समन्वय : वेगवेगळ्या जहाजांमधील संवाद जलद होईल. त्यामुळे यशस्वी कारवाया होतील.
सागरी सुरक्षा : हिंद महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरासारख्या भागात देखरेख मजबूत केली जाईल.
Comments are closed.