iPhone 40 हजाराहूनही कमी किंमतीत!
iPhone discount offer : यावेळी सर्वात मोठी बातमी ही iPhone 14 च्या किमती विषयी आहे. iPhone 14 फक्त 39,999 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो, इतर बँकींग सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. ही बातमी आश्चर्यजनक बातमी आहे कारण, सध्या या फोनची किंमत 52,990 आहे आणि लाँच करण्याच्या वेळी त्याची किंमत 79,999 होती.

iPhone 14 चा बेस मॅाडल 128GB आणि ब्लू, मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट और (PRODUCT) RED या रंगात उपलब्ध आहे, इतक्या कमी किंमतीत iPhone ची विक्री पहिल्यांदाच होत असल्या कारणाने ही बातमी युवक आणि टेक प्रेमींसाठी आनंददायी आहे.

iPhone 14 सोबतंच Apple ने प्रिमियम मॅाडल्सवर सुद्धा ऑफर लावण्यात आल्या आहेत , iPhone 16 आता 70,000 मध्ये विकला जाणार आहे, लाँच त्या वेळी त्याची किंमत 1,19,000 होती.

आणि iPhone 16 Pro Max च्या किंमत सुद्धा अनेक पटीने कमी. 1,44,000 वरुन थेट 90,000 च्या रक्कमेत विकत घेऊ शकता.

ही सेल 23 सप्टेंबर पासुन सुरू होईल आणि स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स पासुन इलेक्ट्रॅानिक्स पर्यंत सर्व वस्तूंवर जबरदस्त ऑफर लावण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की Axis किंवा ICICI चं क्रेडिट कार्ड वापरल्याने 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल.

दरवर्षीप्रमाणे फ्लिपकार्ट ची बिग बिलियन डेज सेल सर्वात मोठ्या ऑनलाईन शॅापिंग इव्हेंट्स पैकी एक असणार आहे, पण iPhone 14 आणि iPhone 16 वर मिळणार्या ऑफर्स मुळे आणखी खास ही ऑफर झाली आहे २०२५ ची ही सेल Apple iPhones वर लागलेली सर्वात मोठी सेल असणार आहे.

ई-कॅामर्स साइट फ्लिपकार्ट (Flipkart) वर Samsung Galaxy S24 Ultra 5G वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट चालु आहे. माहीतीनुसार, फोनच्या 12+256GB वेरिएंट ची किंमत 1,34,999 रूपये आहे पण त्यावर 40% डिस्काउंट देण्यात येणार आहे ज्यामुळे त्याची किंमत ही 79,999 झाली.

EMI पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत ज्यात तुम्हाला 3770 चा हप्ता भरावा लागेल. बँकिंग पर्यायाने तुम्ही आणखी कमी किंमतीत वस्तू विकत घेऊ शकता.
येथे प्रकाशितः 13 सप्टेंबर 2025 04:13 पंतप्रधान (आयएसटी)
टेक-गॅजेट फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.