शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले 1800 कोटी, घोषणा 31 हजार कोटींच्या पॅकेजची; पंचनाम्याअभावी 27 जिल्हे मदतीपासून वंचित

राज्यातल्या 29 जिह्यांतल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका पडला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ३१ एक हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची महायुती सरकारने घोषणा केली. त्यापैकीएक हजार ८३६ कोटी ५७ दशलक्ष रु. वितरित केले करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागांतील जिह्यांकरिता 480 कोटी 37 लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात 1 हजार 356 कोटी 30 लाख रुपयांची भर पडली असून एकूण 1 हजार 836 कोटी 57 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिह्यांसाठी ही मदत देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील अकोला जिह्यासाठी 91 कोटी 12 लाख 58 हजार, बुलडाणा जिह्यासाठी 289 कोटी 27 लाख 28 हजार, वाशीम जिह्यासाठी 34 कोटी 64 लाख 84 हजार, जालन्यासाठी 83 लाख 84 हजार, हिंगोलीसाठी 64 कोटी 61 लाख 83 हजार अशी एपूण 480 कोटी 50 लाख 38 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. या जिह्यांतील पिकांच्या नुकसानीपोटी 6 लाख 72 हजार 866 शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.

इतर जिल्हे

n बीड      ः — 577 कोटी 78 लाख रु.

n धाराशीव —————————– ः     – 292 कोटी 49 लाख रु.

n लातूर   ः — 202 कोटी 38 लाख रु.

n परभणी —————————— ः     245 कोटी 64 लाख रु.

n नांदेड :– रु. २८ कोटी ५२ लाख.

n सातारा ——————————- ः     6 कोटी 29 लाख रु.

n कोल्हापूर ः—- 3 कोटी 18 लाख रु.

n बाधित शेतकरी संख्या – 21 लाख 66 हजार 198

n बाधित क्षेत्र – 15 लाख 16 हजार 681 हेक्टर

राज्य शासनाने आज अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 1 हजार 356 कोटी 30 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मकरंद जाधवपाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

Comments are closed.