औंढ्यातील आदिनाथ मंदिरात पाणी शिरले

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरात पावसाचे पाणी शिरले आहे. पावसाचे पाणी मंदिरात तीन ते चार फूट शिरल्याने शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. हिंगोली जिल्हाभरात मागील तीन- चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पावसाचे पाणी आदिनाथ मंदिरात तीन ते चार फूट शिरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
आज चौथा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविक दर्शनासाठी आले होते. परंतु, शिवलिंग पाण्याखाली गेल्यामुळे अनेक भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. तर काही भाविकांनी पाण्यातून वाट काढत मंदिरात जाऊन आदिनाथाचे दर्शन घेतले आहे.
Comments are closed.