सोन्याच्या दरात चढ-उतार! गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावं? सध्या सोन्याचा दर किती?

सोन्याच्या किंमतीच्या बातम्या: सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्यानं चढ उतार होत आहे. सोने ही अशी गुंतवणूक (investment) आहे जी शतकानुशतके लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. मात्र, दरातील बदलांमुळं गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. अशा स्थितीत सोने खरेदी करावं की विकावं? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

आज सोन्याचा भाव किती ?

आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,094 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदीची किंमत 92,475 रुपये प्रति किलो आहे. अलीकडेच, अर्थसंकल्प 2025 मध्ये, सरकारने आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं सोने आणि चांदीच्या किमतींना दिलासा मिळाला आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आयात शुल्क वाढवण्याचे संकेत दिले असून त्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमती वाढू शकतात.

सोने खरेदी करणे कितपत फायदेशीर?

सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जी महागाईच्या काळात त्याचे मूल्य टिकवून ठेवते. जेव्हा इतर मालमत्तेच्या किंमती कमी होतात. तेव्हा सोन्याच्या किंमती अनेकदा वाढतात. त्याचबरोबर सोन्याच्या किमती जागतिक बाजारावर अवलंबून असतात. जागतिक स्तरावर अनिश्चितता किंवा आर्थिक संकट आल्यास सोन्याची मागणी वाढते आणि त्याचे मूल्य वाढते. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोने हा एक चांगला पर्याय असू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या, सोन्याने दीर्घकाळात चांगला परतावा दिला आहे.

सोने विकण्याची कारणे

तुम्ही अल्पावधीत नफा कमावण्याचा विचार करत असाल, तर बाजारातील चढउतार तुम्हाला विक्रीची संधी देऊ शकतात. जर तुम्ही आधीच जास्त किंमतीला सोने खरेदी केले असेल आणि आता किंमत वाढली असेल, तर विक्रीसाठी ही योग्य वेळ असू शकते. याशिवाय जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होत असेल किंवा तुम्हाला लगेच पैशांची गरज असेल तर जुने सोने विकणे हा एक पर्याय असू शकतो. जर तुमचा बराचसा पोर्टफोलिओ सोन्यात गुंतवला असेल, तर ते विकणे आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे देखील एक शहाणपणाचे पाऊल असू शकते.

या कारणांचाही सोन्यावर परिणाम

यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) ने आपल्या धोरण बैठकीत बाजाराच्या अपेक्षेनुसार फेडरल फंड रेट 4.25-4.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. फेडरल रिझर्व्हने सूचित केले आहे की व्याजदरात कपात करण्याची घाई नाही. याशिवाय, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि सेंट्रल बँक ऑफ साउथ आफ्रिकेने त्यांच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. ECB ने त्याचा ठेव दर 2.75 टक्के कमी केला. त्याच वेळी, अमेरिकेचा Q4 जीडीपी वाढीचा दर 2.3 टक्के होता, जो अपेक्षित 2.6 टक्क्यांपेक्षा कमी होता आणि मागील तिमाहीच्या 3.1 टक्क्यांपेक्षा कमी होता. वैयक्तिक वापर 4.2 टक्के नोंदवला गेला, जो आधीच्या 3.2 टक्के अंदाजापेक्षा चांगला होता. याशिवाय अमेरिकन डॉलर निर्देशांक 0.07 टक्क्यांनी घसरून 107.92 वर राहिला.

अधिक पाहा..

Comments are closed.